असाच एक दिवस
मनावर दाटून
आलेलं मळभ
विचारात बुडून
गेलेला दिवस कलत चाललेला.
आणि
संध्याकाळची
लागलेली चाहूल.
भरलेलं मोकळं
व्हावं असं वाटलं;
मोबाईल उचलला सराईतपणे
मेसेज धाडला
चल रे बाहेर
जाऊ...
मेसेज बघितला
जाणार नाही
या खात्रीने परत
आणखी एकदा मेसेजलो
नो रिप्ले...
परत २०
मिनिटांनी अजून एकदा आठवण
या क्षणाला
मेसेज रिड झाल्याची पावती
आज......?
विचारणा समोरुन
उद्या नक्की उत्तरही
समोरुन.
भरलेल्या
डोळ्यातून मोबाईलही दिसेना...
दोन मिनिटांनी
डोळे पुसून
पुन्हा मेसेज
केला ...
यार “Tomorrow never come.”
हसलो एकटाच...
बसलो एकटाच...
रडलोही एकटाच...
हळूहळू शांत होत
गेलो...
“आपल्यासाठी
खांदा नाही.”
पुन्हा एकदा
जाणिव;स्वच्छ जाणिव.
असे आयुष्य घडवणारे
काही क्षण भेटतात
आपण जगाला गृहीत
धरतो.
पण जगाचं तसं नसतं.
हे त्रिवार सत्य
असल्याची जाणिव
हल्ली वेळोवेळी
होताना दिसते.
“नाही” म्हणायला
शिकायला हवं...
आपल्या
सोयीप्रमाणे असेल;
तर ठीक अन्यथा “मूड” नाही…
आपण आपला “मूड”
समोरच्यासाठी
समोरच्याच्या सोयीने
बदलवत जातो.... का ...?
तर आपल्या मुडचा
अडथळा
इतरांच्या
अडचणीत होऊ नये
याची आपण खूप
काळजी घेतो.
आता येथून पुढे हे
होणे नाही.
काल एका
मित्राच्या “मैत्री” जाणिवेतून
मी घरच्यांना
जेवण्यासाठी
तब्बल 50 मिनिटे
ताटकळत ठेवलं;
{रात्री पावणे अकरा वाजेपर्यंत}
[हे नेहमीचंच आहे म्हणा]
काय अधिकार आहे
आपल्याला.
सगळ्या गोष्टी
आपण
सोडून देत चालतो
म्हणून हे
चाललंय.
आपल्याला स्वतःत
बदल करायला हवा.
अगदी
प्रयत्नपूर्वक करायला हवा.
आपला स्टॅमिना
जास्त आहे
आणि
समोरच्याचा
नाही.
“हा आपला दोष
नक्कीच नाही.”
समोरचा स्टॅमिना
वाढवायचा प्रयत्न करत नाही
आपणही तो ‘अशा माणसांसाठी’ का “खर्ची” घालावा.
हे बरेचदा
घडलेलं आहे;पण
स्साला आपण
सुधारत नाही...
पण
नाही म्हणायला
शिकायला हवं...
नाही म्हणायला
शिकायला हवं...
नक्कीच शिकायला
हवं...
@जीवनयात्री.
_दत्तात्रय उदारे.
व्वा!छान 👌
उत्तर द्याहटवा