#भुछत्र
#सौंदर्य
#नजर
सुंदरता कशात दिसेल
याचा काय नेम.
तुमची नजर
जर #दर्दी असेल
तर तुम्हाला कशातही
सुंदरता दिसेल.
आपण आपले डोळे
उघडे ठेवले
तर समजेल की
बारीकसारीक गोष्टीतही
आपण सौंदर्य शोधू शकतो.
नाहीतर…
नजर नसेल तर ती तयार करा...
नक्की जमेल.
भुछत्राचं आयुष्य असं कितीसं असणार
पण रुबाब म्हणाल
तर #आसमां को छूनेवाला
फक्त तो मिरवता आला पाहिजे.
शेवटी जीवन म्हणजे तरी काय हो…
#आनाऔरजाना_हैं
पण या
#आना
आणि
#जाना
यामधला जो #काळ आहे ना
तो मात्र रुबाबात असावा.
असं सगळ्या जीवांना वाटत असतं.
जो तो जीव
त्या ऐटीत राहतोही मिरवतोही.
हाच आनंद मोठ्ठा असतो.
हा जो आनंद मोठा होतो
तो मनाला भुरळ पाडत असतो
आणि
त्या भुरळीतला आनंद
कसा वाढवता येईल
याचा त्या जीवाने केलेला आटापिटा
खरं #समाधान मिळवून देत असतो.
तो जमेल तसा लुटला पाहीजे.
शेवटी या सगळ्या गोष्टी
भौतिक सुखातच मोजल्या जातात.
भौतिक सुखाची चव चाखलेला जीव
असे आनंद ठायी ठायी
शोधण्याचा प्रयत्न तर करतोच ना…
तसाच हाही #click चा आनंद…
नजरेला दिसला
आणि
नजर सुखावली.
त्यासाठी किती हा प्रपंच…
बापरे…
© दत्तात्रय उदारे.
