गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

आयुष्य कसं #चवीनं जगायचं...

#बेचव आणि #निरस आयुष्य जगणाऱ्या #माझ्या खास #मित्रांसाठी

 

आयुष्य कसं #चवीनं जगायचं...

 

एका माणसाकडे १०० उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्या माणसाची नेमणूक केली.

 

दुसर्या माणसाला त्याने एक अट घातली कीरात्री त्याने पहार्यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही. एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.

 

दोन दिवसतीन दिवस त्याला झोप मिळाली नाही. तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र १५ / २०  दिवस तो झोपू शकला नाहीकारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.

 

एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. १०० पैकी ९९ उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना. म्हणून बर्याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावं लागलं.

 

वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, “एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत.

 

त्यावर तो म्हणाला मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही. माझ्या वेळेत मी झोपत होतो. कारण सर्व एकावेळी झोपणे हे अशक्य आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…..!!!!!!!!”

 

"Moral of the story…"

मित्रांनोआपण आपल्या आयुष्यात बर्याचदा असे ठरवतो की आता हा एक टप्पा पूर्ण केला की मग संपलं सगळंमग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले की मी निवांतमला कुठलीही काळजी नाहीमग मी आनंदात जगेन. हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं की मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..

 

त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतोएखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो. पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालोअसं म्हणून श्वास सोडतोपण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.

 

आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचेचिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीतएखादा जागा राहणार आहेचत्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नकात्याकडे थोडसं” दुर्लक्ष कराआणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगू नका!!!

जीवनाचा आनंद घ्या !!!!

 

जिंदगी ना मिलेगी दोबारा” चित्रपटात कतरिना हृतिकला त्याचे प्लॅन विचारते. वयाच्या पंचेचाळीशीनंतर मी कामधंदा बंद करुन माझे छंद जोपासणार असं तो सांगतो. त्यावेळी ती म्हणते, “ ४५ वर्षांपर्यंत तू जगशील याची खात्री काय?” आणि आवाक् झालेले ते मित्र आयुष्य खर्या अर्थाने जगायला सुरुवात करतात.

 

तसं आपल आयुष्य होतंय का…? 

नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहिल का…? 

हे तरी आपल्याला माहीत आहे का…? 

याचाही विचार होणं गरजेचं आहे.

बघा विचार करा…!!

 ©Dattatraya Udare

























 

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

#भुछत्र





 

#भुछत्र

#सौंदर्य

#नजर

 

सुंदरता कशात दिसेल

याचा काय नेम.

तुमची नजर

जर #दर्दी असेल

तर तुम्हाला कशातही

सुंदरता दिसेल.

आपण आपले डोळे

उघडे ठेवले

तर समजेल की

बारीकसारीक गोष्टीतही

आपण सौंदर्य शोधू शकतो.

नाहीतर

नजर नसेल तर ती तयार करा...

नक्की जमेल.

भुछत्राचं आयुष्य असं कितीसं असणार

पण रुबाब म्हणाल

तर #आसमां को छूनेवाला

फक्त तो मिरवता आला पाहिजे.

शेवटी जीवन म्हणजे तरी काय हो

 

#आनाऔरजाना_हैं

 

पण या

#आना

आणि

#जाना

यामधला जो #काळ आहे ना

तो मात्र रुबाबात असावा.

असं सगळ्या जीवांना वाटत असतं.

जो तो जीव

त्या ऐटीत राहतोही मिरवतोही.

हाच आनंद मोठ्ठा असतो.

हा जो आनंद मोठा होतो

तो मनाला भुरळ पाडत असतो

आणि

त्या भुरळीतला आनंद

कसा वाढवता येईल

याचा त्या जीवाने केलेला आटापिटा

खरं #समाधान मिळवून देत असतो.

तो जमेल तसा लुटला पाहीजे.

 

शेवटी या सगळ्या गोष्टी

भौतिक सुखातच मोजल्या जातात.

भौतिक सुखाची चव चाखलेला जीव

असे आनंद ठायी ठायी

शोधण्याचा प्रयत्न तर करतोच ना

 

तसाच हाही #click चा आनंद

नजरेला दिसला

आणि

नजर सुखावली.

त्यासाठी किती हा प्रपंच

बापरे

 

© दत्तात्रय उदारे.     


 


 

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

#वेळ



#वेळ:

 

वेळ आहे का वेळ

हल्ली कुणाकडेच नसलेली

पण

प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी गोष्ट

एव्हाना लक्षात आलेही असेल

आणि

नसेल आले

तर फार काही विचार करु नका

मी वेळेबद्दल बोलतोय.

आजूबाजूला बघा

जग कसं धावतंय

कुणाकडे साधी

दोन मिनिटेसुद्धा नाहीत फुरसतीची

की तो मोकळा श्वास घेईल.

घड्याळाची टिकटिकच

माणसाच्या हृदयाची

धडधड बनून गेलीय

इतका माणूस यंत्र बनलाय

हो यंत्रच बनलाय

भावभावनांचा दुरदूरवर

कसलाही त्याचा संबंध उरलेला दिसत नाही.

स्वप्न पाहणं ही मानवी प्रवृत्ती नक्कीच असेल

आणि

ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी

ऊर फुटेस्तोवर

करावी लागणारी धावपळ

ही दमछाक करणारी नक्कीच आहे.

त्यासाठी अथक परिश्रम 

घ्यावेच लागतात 

त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही हो….

पण

हे सगळं करत असताना

तुमच्यात लपलेला

एक कलासक्त माणूस 

जिवंत ठेवायला हवा 

हे विसरुन कसं जमेल..

आणि

समजा 

जर असा #सृजनशील माणूस 

तुमच्यातून #लोप पावला 

तर पाहिलेलं स्वप्न 

जेव्हा साकार होईल 

तेव्हा तुम्हाला तितका #आनंद होईल का

कारण 

आनंद #साजरा करायला 

फक्त तुम्ही एकटे 

कधीच #पुरेसे नसता 

हे लक्षात घ्या.

त्यासाठी एक 

जोडीदार,सखा, मित्र असावा लागतो..

त्यासाठी 

किंवा 

तो मित्र समजून घेण्यासाठी 

#वेळ खर्च करावा लागतो.

नाहीतर आपला आनंद 

क्षणिक ठरण्याची शक्यता 

नाकारता येत नाही.

मग आता लक्षात घ्या 

जर तुमच्यात दडलेला जीव 

खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी 

त्याला जरा वेळ द्यायला शिका.

त्याला हवी असलेली स्पेस द्या,

फुलायला लागणारा वेळ द्या 

कधीतरी त्याला

शहरी जीवनापासून 

दूर घेऊन जा 

स्वतःमध्ये डोकावण्याची संधी उपलब्ध करुन द्या.

पण

हल्ली हे होत नाही 

कारण #वेळ नाही ना… !! 

नाहीच का वेळ तुमच्याकडे ??? 

एकदा तुमचा दिनक्रम बघा.

टीव्हीसमोर तासन्तास बसता

मोबाईल अर्थात सोशल मिडियावरही तेच,

वायफळ गप्पाटप्पा यातही व्यस्त असता 

आणि

तरीही आपल्याला #वेळच नसतो नाही का…! 

मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर पळायला लागला.

कल्पनाविश्वात रमायला लागला

पण

त्यामुळे वास्तवात मात्र तो #एकटा पडायला लागला.

या एकटेपणातून येणारं 

#डिप्रेशन

त्याच्या अस्तित्वावरच घाला घालायला लागलं.

सगळं कसं अस्ताव्यस्त

आणि

हाताच्या बाहेर जात चाललंय

सगळ्या गोष्टी 

जर अशाच हाताबाहेर गेल्यावर 

आम्ही जागे होणार असू 

तर आपल्या वाट्याला फक्त 

उध्वस्तपणा येणार हे नक्की

आपण काही गोष्टी जाणूनबुजून केल्या पाहिजेत.

बोलते व्हायला शिकले पाहिजे 

एकमेकांशी संवाद साधला गेला पाहिजे 

कुठला तरी #कट्टा 

जवळ केला पाहिजे 

जेणेकरुन वेळ 

अर्थात असलेला वा काढलेला

आपल्याला मोकळेपणा देऊन जाईल. 

 

खूप पैशालाही महत्व देऊन

स्वास्थ हरवून आलेली श्रीमंती

तुमचं जगणं सुसह्य करेल 

असं वाटत असेल तर विसरुन जा.

पैसा साधनं देऊ शकतो 

समाधान आनंद नाही.

 

कारण

अजून तरी 

आनंद आणि समाधान 

विकणारी दुकानं थाटल्याचं 

ऐकण्या-पाहण्यातच काय 

पण स्वप्नातही दिसली नाहीत

भौतिक सुखं ही खूप गरजेची नक्कीच आहेत

मी तर बरेचदा असं म्हणत असतो की

आम्ही सुख शोधणारी माणसं आहोत 

#सुखलोलुप म्हणा हवं तर.

ते जिथ्थे मिळेल तिथ्थे आम्ही त्याच्या शोधात जातो.

आवडतील अशा गोष्टी करतो,

वेळ काढून मस्त एखाद्या टेकडीवर,डोंगरावर जातो 

त्या शांततेत 

मनाशी संवाद साधतो.

कधी सूर्योदय 

तर कधी सूर्यास्त 

अनुभवतो.

त्याच्याशी एकरुप होऊन

तल्लीन होऊन छाती फुगवून 

अगदी फुफ्फुसं भरुन

ताजी स्वच्छ 

आणि 

मनाला तजेला देणारी हवा 

भरुन घेतो

असा तो अवर्णनीय सोहळा अनुभवतो. 

 

निर्जीव गोष्टींत 

नाही सापडला तुम्हाला तर 

जिवंत माणसं 

तीही मनमोकळी आणि जीवाभावाची कमवा.

सहवास 

हा तर नक्कीच चमत्कार घडवेल तुमच्या आयुष्यात.

अशी #कसरत केली तरच

संतुलन साधले जाईल

आणि मनाची अवस्था ही

#आनंदाच्या डोही #आनंद तरंग 

अशी परस्परपूरक होऊन जाईल.

कसरत 

मुद्दाम म्हणालो कारण आज ही कसरतच ठरतेय...

अगदी तारेवरची म्हणालात तरी वावगं ठरु नये...

चला 

तर कधी वेळ मिळालाच तुम्हाला 

तर बोलत जाऊ प्रेमाचे चार शब्द

असलेला वेळ

छान #टाईमपास करत जाऊ

     

 

                      ©दत्तात्रय_उदारे.