मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

टप टप टप टप टाकित टापा




                
आम्ही लहान असताना शाळेत फार सुरेख आणि सुरेल चाली असलेल्या कविता असायच्या.काही कविता आजही गुणगुणाव्याशा वाटतात. गेयता हा एक महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे पाठ करण्यास विशेष कष्ट घ्यावे लागत नसत,अगदी सहज त्या पाठही व्हायच्या.त्यापैकीच एक म्हणजे ही कविता .


टप टप टप टप टाकित टापा - शांता शेळके


टप टप टप टप टाकित टापा 
चाले माझा घोडा |
पाठीवरती जीन मखमली 
पायि रुपेरी तोडा || धृ ||



उंच उभारी दोन्ही कान

ऐटित वळवी मान-कमान

मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा || १ ||



घोडा माझा फार हुशार

पाठीवर मी होता स्वार

नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढा || २ ||



सात अरण्ये, समुद्र सात

ओलांडिल हा एक दमात

आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा || ३ ||