#जगन्नाथ
आकलनाच्या पलीकडे
एक विश्व असतं..
आणि
मानलं तर
भावनेच्या पलीकडेही एक जग असतं..
दिलेला आवाज
(साद घालणे याअर्थाने)
जेव्हा फक्त
कर्णपटलावर आपटून
विरुन जातो
तेव्हा समोरच्यानेच
काहीतरी ठरवायची वेळ असते.
उभ्या जगासाठी
महाभारताचं युद्ध घडवून
#अधर्म
कधी धर्माने
तर कधी अधर्माने
संपवणारा
#श्रीकृष्ण
स्वतःच्याबाबतीत मात्र अव्यक्तच राहतो.
किती अव्यक्त राहतो
याचा विचारही न केलेला बरा.
ज्यावेळी कृष्ण देह ठेवतो तेव्हा
यदुवंश दुर्वास ऋषींच्या शापाने नष्ट
झालेला असतो.
अंत्यसंस्कारानंतरही
श्रीकृष्णाचे अर्थात जगन्नाथाचे हृदय
अर्थात काळीज धडधडत असते
ते नष्ट होत नाही.
त्याला जलात प्रवाहित केलं जातं.
आजही असं म्हटलं जातं कीं;
भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये
ते अस्तित्वात आहे.
हे याचंच तर
प्रतिक नसेल ना...
किं;
श्रीकृष्णाला त्याचं असं कोणी भेटलं नाही
जिथं त्याला व्यक्त व्हायला जमलं असतं.
या सगळ्या गोष्टी
जिथं दडपल्या गेल्या
ते हृदय मात्र आजही एकाकी उरलं आहे,
अव्यक्त उरलं आहे..
सुधीर मोघे लिहितात त्याप्रमाणे..
❝जो तो आपापला येथे
कुणी ना आधार
मनाचिया घावावरी
मनाची फुंकर❞
#©दत्तात्रय_उदारे.
Dattatraya Udare DM