आम्ही
इयत्ता तिसरीत असू तेंव्हा ......
चौथीत जाण्याची प्रचंड ओढ लागलेली कारण आम्हाला
तिसरीत असणाऱ्या कवितांपेक्षा चौथीला असणाऱ्या कविता खूप
आवडायच्या. तिसरीच्या वर्गात बसून आम्ही चौथीच्या वर्गात मुले
तन्मयतेनं गाणारी कविता ऐकायचो. मधल्या सुट्टीत आशाळभूत
नजरेनं कविता अन् चित्र निरखायचो .
एक वेगळीच मनाला हुरहूर लावणारी भावना निर्माण व्हायची.
कधी एकदा आम्ही चौथीला जातोय आणि ठेक्यात कविता म्हणतोय
असं वाटायचं. आजच्यासारखंच तेंव्हाही उद्याची ओढ जास्त होती.
वय वाढत जातं आणि असं वाटायला लागतं की आता
गतकाळात जाता येईल का ? वय कमी करता येईल का ?
अजून तरुण होता येईल का ?
अगदी वर्गात बसून "पाहुणा गोजिरा" कविता गाता येईल का ?
मनाचं काय हो त्याला काहीही वाटतं .......
काहीच नाही करता आलं तरी निदान कविता तरी
निश्चितच गुणगुणता येईल.
_दत्तात्रय उदारे.
पाहुणा
गोजिरा
आज ये अंगण,पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या,सोयरा साजिरा || धृ ||
वाजता नौबती,
ये सखा सोबती,
खेळवा संगती,हा जरा लाजरा || १ ||
कोवळे देहुडे,
सावळे रुपडे
पोपटी
अंगडे,शोभते सुंदरा || २ ||
हा वसंतासवे,
सृष्टीला हासवे
पालवे बोलवे,सानुल्या पाखरा || ३ ||
श्रावणी
न्हातसे
अश्विनी गातसे
साउली देतसे भूमिच्या लेकरा || ४ ||
बासरी ऐकतो,
चांदणे झोकतो,
नाचतो,डोलतो,झोंबतो अंबरा || ५ ||
गीत गाता मुखी,
नाचवा
पालखी
छत्रछायाकृती मित्र आला घरा || ६ ||
_बाबा
आमटे

Very nice
उत्तर द्याहटवासर कविता कोणत्या साली कोणत्या इयत्तेची आहे.
उत्तर द्याहटवा१९८५-८६ सालच्या अभ्यासक्रमात होती.
उत्तर द्याहटवा