जगताना
जगणं
नाही हरवलं पाहिजे;
नाहीतर
फक्त
दिवस सरत जातात
जगणं
होतंच नाही.
भावनांच्या
वादळात
माणसं
दुखावण्याचा
संभव
असतो.
तो
टाळता येईलच
असे
नसते.
पण
असे
क्षण
जितके
टाळता येतील
तितके
कटाक्षाने
टाळायचा
प्रयत्न असायला हवा.
कारण
कुठलंच
नातं
कधीच
परिपूर्ण असत नाही.
न
जमणाऱ्या गोष्टी
सोडूनही
देता आल्या पाहिजेत
तरच
जमणाऱ्या
गोष्टींना महत्व येत जातं
आणि
नातं
अधिक घट्ट होत जातं.
#बस_इतनाही!!
#जीवनयात्री
©दत्तात्रय
उदारे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा