आपण आपलं आयुष्य जगतानासुद्धा हातंचं राखून जगत असतो.कारण जिथं तिथं आपली इमेज आडवी येते ,कोण काय म्हणेल....? ...... हे बरं दिसेल का ? .......काय करू...?....करू का नको...?,असे एक ना अनेक प्रश्न घेऊन आपण मिरवत असतो. हे आणि असले प्रश्न आपलं आयुष्य मात्र अवघड करून टाकतात.अगदी इतके अवघड की आपलं जगणं प्रश्नचिन्ह बनून जातं. रस्त्याने चालताना रस्त्यात खडा दिसतो तो खडा बुटाच्या टोकाने उडवायची इच्छा होते लगेच मनात कसं दिसेल.....? .....आपलं असलं वागणं .....?...शोभेल का......?..... आपल्याला हे .....?आणि आपण झटक्यात ती उर्मी दाबून टाकतो.कधीतरी हिंमत करून बघा किती वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतंय.अनुभव घ्यायला काय हरकत आहे. या आणि अशा असंख्य छोट्याछोट्या आनंदाला आपण मुकत असतो.कोणाला काय वाटतं याचा विचार करण्यापेक्षा मला काय वाटतंय.... याचा विचार करायला हवा.सगळ्यात महत्वाचं काय.... तर जग आहे म्हणून मी आहे..... का मी आहे म्हणून जग आहे...... हे ठरवता यायला हवं. हे जमलं की जगणं येतंच हो.....आणि नाही जमलंच तर म्हातारपणी नक्कीच पश्चात्ताप आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही;पण त्यावेळी वेळ गेलेली असेल........सो मित्रांनोमजा करा बिनधास्त जगा. जगाला ""नेहमी"" आपल्या ठोकरीत ठेवायची सवय लावा. या आणि अशा गोष्टी ठोकरीत उडवता आल्याच पाहिजेत हो........
चार ओळीची कविता जमेल का नाही असे वाटले,पण काय हरकत आहे म्हणून प्रयत्न केला.....जमल्यासारखं वाटलं,उत्स्फूर्त जे वाटलं ते शब्दात गुंफण्याचा प्रयत्न केला तो असा.......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा