मनुक्ष प्राणी
क्षणाक्षणाला माणूस काहीतरी शिकत असतो मग ते चांगलं असू शकतं वाईट
असू शकतं. आजवरच्या आयुष्याने खूप समृद्ध
करणारे अनुभव नक्कीच दिले;पण आपण त्याच्यातून काहीच शिकू शकलो नाही...
सगळ्या गोष्टी समजत होत्या उमजत
होत्या, पण प्रत्येकवेळी “चलता है...” असं स्वत:ला बजावत गेलो; समोरच्याचं दु:ख
वेदना आपली समजत गेलो. पावलापावलावर स्वत:ला फसवत राहीलो,तोही आपलाच आहे नि हाही
आपलाच आहे;पण स्साला आपलं कुणीच नव्हतं रे....! 😓
नेहमी
वळचणीचीच जागा आपल्या वाट्याला येत गेली आपणही ती गपगुमान स्विकारत गेलो. त्या-त्यावेळी असं वाटत गेलं आज त्याच्यावर वेळ आहे उद्या आपलीही असू शकते...!! पण आपली
वेळ आल्यावर आपली माणसं आपल्या आसपाससुद्धा दिसली नाहीत; पण आपलीही वेळ कधी अडून
राहीली नाही हे खरंंय...
आपल्यासाठी धावलेल्यांसाठी मात्र आपणही कसर ठेवली नाही;प्रसंगाला उभेच
राहीलो... मग नेहमी आपल्यालाच हे “झारीतले शुक्राचार्य “ का भेटतात. अडचणीतून
मार्ग शोधायला मग त्यावेळी आपण चालतो मग ऊन असो,वारा असो,पाऊस असो,वा थंडी
असो;तो दिवस असो रात्र असो नाहीतर अपरात्र असो... आपण नाही म्हणायचं नाही पण
समोरच्याने मात्र लगेच प्रश्नचिन्ह [?] घेऊन तोंड काढायचं ...
पहिला
प्रश्न असतो आत्ता ? ह्यावेळी ?,लगेच ? ...कसं हो...? आपण डोळेसुद्धा भरून आणू शकत
नाहीत;कारण आपल्याला हे जमतच नाही. म्हणून आपल्याला अडचणी नसतील का...? आपल्या समस्या नसतील
का...? प्रत्येकाला वाटतं यांचं सगळं कसं “ऑल इज वेल” असतं.
“सल” असते प्रत्येकाच्या आयुष्यात;कुणाजवळ तरी व्यक्त करता येते. आपल्या वाट्याला असा एकही खांदा आज आत्ता अखेर लाभलाच नाही हो...
हल्ली खूप वादळं मनामध्ये चालू असतात;अश्रूंनाही शॉवरचा आधार घ्यावा लागतो.
बदलायचा खूप प्रयत्न करतोय पण जमत नाही... वेळेप्रमाणे आपलं मन समोरच्यासाठी कच
खातं... मग पुन्हा आपलं झाकून ठेवायचं आणि समोरच्याचंच वाटून घ्यायचं...
ना ते
सुधारतात ना मी . . . . . . !!!!!!!!
_दत्तात्रय उदारे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा